E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बेन डकेट, ओली पोप, क्रावली यांची शानदार शतके
Samruddhi Dhayagude
24 May 2025
टेंट ब्रिज, नॉटिंगहँम : डकेटने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धुडकावून लावले आणि १०० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जाणार्या चार दिवसांच्या कसोटी सामन्यात बेन डकेट सुरुवातीपासूनच उत्तम लयीत दिसला. तो तुफानी पद्धतीने फलंदाजी करताना दिसला.
डकेटला दुसर्या टोकाकडून जॅक क्रॉलीचीही चांगली साथ मिळाली आणि दोघांनीही फक्त २० षटकांत १०० धावांचा टप्पा ओलांडला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर डकेटने आपली चमकदार फलंदाजी सुरू ठेवली आणि १०० चेंडूंमध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले. डकेटने १३४ चेंडूत १४० धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या खेळीदरम्यान, इंग्लिश सलामीवीर झॅक क्रावली याने १७१ चेंडूत १२४ धावा करत इंग्लंडच्या संघासाठी दुसरे शतक साकारले. त्यानंतर तिसर्या क्रमांकावर आलेला ओली पोप याने १७१ धावा करत तिसरे शतक इंग्लंडसाठी केले. त्यानंतर रूट याने ३४ धावा केल्या. त्याला मुझरबानी यने शानदार गोलंदाजी करत सिन विल्यमसकडे झेलबाद केले. हॅरी ब्रुक याने ५८ धावा करत अर्धशतक केले. स्टोक्स हा ९ धावांवर असताना मुझरबानी याने बेन करनकडे त्याला झेलबाद केले. जेमी स्मिथ याने नाबाद ४ धावा केल्या. २५ अवांतर धावा संघाला मिळाल्या. त्यामुळे इंग्लंडचा संघ ९६.३ षटकांत ५६५ धावा करू शकला. यावेळी ६ फलंदाज बाद झाले.
आगामी कसोटी मालिकेत डकेट भारतीय गोलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. इंग्लंडचा हा सलामीवीर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि गेल्या १२ डावांमध्ये त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. जर डकेटने भारताविरुद्ध हाच फॉर्म सुरू ठेवला तर भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात.
झिम्बाब्वेचा संघ २२ वर्षांनी इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामना खेळण्यासाठी आला आहे. झिम्बाब्वेने इंग्लंडमध्ये शेवटचा कसोटी सामना २००३ मध्ये खेळला होता. पण, झिम्बाब्वे इंग्लंडविरुद्ध फक्त एकाच कसोटी सामना खेळणार आहे. या कसोटी सामन्याद्वारे, इंग्लंड भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीचा आढावा घेईल. भारताविरुद्धची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामाच्या समाप्तीनंतर भारतीय संघ इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. पण याआधी डावखुरा इंग्लिश फलंदाज बेन डकेटने भारतीय संघाच्या अडचणी वाढवल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यासारखी फलंदाजी करून त्याने फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या भूमीवरून टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत डकेट टीम इंडियाच्या गोलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.
Related
Articles
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
अवकाळी पावसामुळे भुईमुगासह पिके पिवळी पडली
30 May 2025
मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापनेच्या तयारीत
29 May 2025
क्रीडा भारतीचे जिजामाता पुरस्कार जाहीर
30 May 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
अवकाळी पावसामुळे भुईमुगासह पिके पिवळी पडली
30 May 2025
मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापनेच्या तयारीत
29 May 2025
क्रीडा भारतीचे जिजामाता पुरस्कार जाहीर
30 May 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
अवकाळी पावसामुळे भुईमुगासह पिके पिवळी पडली
30 May 2025
मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापनेच्या तयारीत
29 May 2025
क्रीडा भारतीचे जिजामाता पुरस्कार जाहीर
30 May 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
अवकाळी पावसामुळे भुईमुगासह पिके पिवळी पडली
30 May 2025
मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापनेच्या तयारीत
29 May 2025
क्रीडा भारतीचे जिजामाता पुरस्कार जाहीर
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी